पुण्यासह देशातील सात विमानतळावर ‘एफआरएस’ यंत्रणा कार्यान्वित होणार !

[ad_1]

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चेहऱ्यावरून व्यक्ती ओळखणारी यंत्रणा (एफआरएस) हा सरकारच्या डिजी यात्रा या उपक्रमाचा एक भाग आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना विमानतळावर कुठलेही अडथळे, अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. या प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ. व्ही. के. सिंह यांनी सोमवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली.

पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पुणे, कोलकाता, वाराणसी, विजयवाडा, बंगळुरू, दिल्ली आणि हैद्राबाद या शहरांमधील विमानतळावर कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विमानतळावर डिजी यात्रा बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टमची प्राथमिक चाचणी, प्रवास करावयाच्या दिवसाची नोंदणी करण्यासह पूर्ण झाली आहे.

या सुरक्षेची आवश्यकता गतिमान स्वरूपाची आहे. देशातील नागरी विमान वाहतूक सुरक्षेसाठी नियामक प्राधिकरण असलेला नागरी हवाई सुरक्षा विभाग (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) इतर संबंधित संस्था आणि भागधारकांशी सल्लामसलत करून, विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला जात आवश्यकतेनुसार ती यंत्रणा अद्ययावत केली जाते, असे सिंग म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

[ad_2]

Source link

Leave a Reply