भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी : दिल्‍लीत रविवारी बैठक होणार

[ad_1]

नवी दिल्ली; वृत्तसेवा

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक येत्या रविवारी नवी दिल्‍लीत होत असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून सोमवारी येथे देण्यात आली. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन संमिश्र पध्दतीने या बैठक घेतली जाणार आहे. म्हणजे नवी दिल्‍लीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी स्वतः फिजिकली हजर राहणार असून राज्या-राज्यांतील नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीस हजर राहतील.

अलिकडेच भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी पुनर्रचना झाली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच कार्यकारिणीची बैठक होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्‍तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावर कार्यकारिणीत प्रामुख्याने खलबते होणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 तारखेला केदारनाथला जाणार असून 6 तारखेला ते उत्‍तराखंडमध्येच विविध कार्यक्रमांत सहभाग घेणार आहेत. त्यानंतर 7 तारखेला होणार्‍या कार्यकारिणी बैठकीत ते सहभाग घेतील. काही मुद्यांवरुन पक्षावर टीका केलेल्या मेनका गांधी तसेच त्यांचे पूत्र वरुण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून गच्छंती करण्यात आली होती. दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे, वीरेंद्र कुमार, अश्‍विनी वैष्णव आदी नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.

हे ही वाचलं का?

[ad_2]

Source link

Leave a Reply