[ad_1]
नवी दिल्ली; वृत्तसेवा : कोरोना महारोगराईची लाट जवळपास ओसरली आहे. देशात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या देखील हळूहळू कमी होत आहे. देशात केवळ ०.०३% म्हणजेच १३ हजार ४४५ सक्रिय कोरोनाबाधित शिल्लक असल्याची माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात १ हजार २६० कोरोनाबाधितांची भर पडली. तर १ हजार ४०४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुदैवाने ८३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६% आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२४ % नोंदवण्यात आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ३० लाख २७ हजार ३५ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४ कोटी २४ लाख ९२ हजार ३२६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुदैवाने ५ लाख २१ हजार २६४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८४ कोटी ५२ लाख ४४ हजार ८५६ डोस देण्यात आले आहेत. यातील १.८१ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहे. तर, २ कोटी ३३ लाख २७ हजार ९५२ बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८५ कोटी २१ लाख ४४ हजार ४९५ डोस पैकी १५ कोटी ६६ लाख २ हजार ५२६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७९ कोटी २ लाख ९८ हजार ९७९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ कोटी २८ लाख २१ तपासण्या शुक्रवारी दिवसभरत करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
देशातील बूस्टर डोसची स्थिती
श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४४,७४,४४०
२) फ्रंटलाईन वर्कर्स ६८,९७,७५५
३) ६० वर्षांहून अधिक १,१९,५५,७५७
हेही वाचलंत का?