[ad_1]
नवी दिल्ली, वृत्तसेवा : महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी मंगळवारी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षात सुरू असलेल्या गदारोळाबाबत राज्यातील आमदारांना प्रश्न केले. तसेच, त्यांनी आमदारांना पाच प्रश्न विचारले. महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसमधील काही मंत्र्यांच्या कामाचाही समाचार त्यांनी घेतला.
सोनिया गांधींनी हे विचारले प्रश्न
- सोनिया गांधी यांनी आमदारांना विचारले की, राज्यात आमदारांच्या सभा होतात का?
- प्रत्येक मंत्र्यांच्या अंतर्गत त्यांच्या जिल्ह्यातील किती आमदार आहेत ?
- प्रत्येक मंत्र्यासोबत जिल्ह्यातील किती आमदार असतात?
- राज्य मंत्रिमंडळात कॉमन मिनिमम प्रोग्रामाला किती प्राधान्य दिले जाते?
- शेवटी त्यांनी सवाल केला की, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांचे प्रश्न महाराष्ट्र सरकारमधील मंत्री गांभीर्याने घेतात का? असे त्यांनी आमदारांना प्रश्न केले.
दरम्यान, आमदारांनी याबाबत आपली मते मांडावीत असे सांगितले. त्यावर आमदार म्हणाले, राज्य सरकारमध्ये दुर्लक्ष होत आहे असे सांगितले. त्यावर आमदारांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले.