पंकजा मुंडेंनी यात्रा काढल्यामुळे त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली- बच्चू कडू

मुंबई

19 कोटींचा कर बुडवल्या प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली दरम्यान पंकजा मुंडे यांनी राज्यात यात्रा काढल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात यात्रा काढली होती या यात्रेत त्यांनी राज्यातील विविध देवस्थानांना भेटी दिल्या होत्या.यात्रेचे स्वरूप राजकीय नसल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते तरीही या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्या या यात्रेपासून भाजप पक्ष श्रेष्टींनी दूर राहणे पसंत करूनही भाजप कार्यकर्त्यांनी मात्र यात्रेला उदंड प्रतिसाद दिला.दरम्यान वैद्यनाथ कारखान्याने 19 कोटी रु जी एस टी बुडवल्या प्रकरणी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली तसेच केंद्र सरकारने राज्यातील इतर कारखान्यांना मदत केली तशी मदत वैद्यनाथला केली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले या प्रकरणात मंत्री पद न मिळाल्यावरून नेहमी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या बच्चू कडू यांनी पंकजा मुंडे यांनी यात्रा काढल्या मुळेचं त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली असा आरोप केला आहे.भाजपकडून अद्यापि कुणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply