छत्रपती शिवरायांच्या जीवना मधील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक घटना आपल्याला व आपल्या संपूर्ण देशाला सतत प्रेरणा देणाऱ्या आहेत.शिवरायांनी सन १६४७ साली अठरापगड आणि बाराबलुतेदार हिंदुंना भगव्या ध्वजा खाली एकत्र आणुन तोरणागडावर हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले होते.पुढे सतत 30 वर्ष परकीय इस्लामी आक्रमका सोबत संघर्ष करून इस्लामी सिंहासने उलथापालथ करून देशाला प्रेरणा देणाऱ्या हिंदूपदपातशाहीची मुहूर्तमेढ रोवली होती.शिवरायांच्या स्वराज्याभिषेका नंतरच्या काळात स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर झाले होते.शिवरायांचे स्वराज्य जरी लहान असले तरी ते आजच्या इस्राईल प्रमाणे सुपर पॉवर स्टेट होते तसेच अमेरिका प्रमाणे स्पष्ट धोरणी स्टेट होते.
अमेरिकीने ज्या प्रमाणे आपल्या राष्ट्राच्या विरोधी शक्ति अल जवाहरी,ओसामा बिन लादेन,गद्दाफि आणि इस्राईलने यासर अराफत सारखे अनेक अतिरेकी, दहशतवादी वेचुन वेचुन ठेचून ठार केले त्याच प्रमाणे शिवरायांनी व शिवरायांच्या मावळयांनी परकीय राष्ट्र विरोधी इस्लामी शक्ति आणि इस्लामी दहशतवादी ठार केले आहेत.त्यामध्ये बलाढ्य अफजलखानाचा वध मोठी घटना असुन अफजलखान वधा मुळे आदिलशाहीचे खच्चीकरण होऊन इतर शाहया व शत्रुत जरब निर्माण झाली होती.दबदबा सुद्धा प्रचंड वाढला होता.आपल्या रॉ व इस्राएलच्या मोसाद समकक्ष असलेल्या शिवरायांच्या गुप्तहेर यंत्रणा”इंटेलिजेंस ब्यूरो”आणि गनिमी काव्याच्या व्युहरचनेतून अफजखानाला प्रतापगढ़च्या पायथ्याशी आणले होते.श्री कृष्ण निति व गनिमी काव्याने कार्तिक शुद्ध सप्तमी दि.१०नोव्हेंबर १६५९ दुपारच्या प्रहरात शिवरायांनी अफजलखानाचा वध करून हिंदू विजयाचा इतिहास रचला होता.आज आपण तो दिवस शिवप्रताप दिन म्हणुन साजरा करतो.
*खोटे कथानक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न?*
छत्रपती शिवराय संपूर्ण राष्ट्राची प्रेरणा असून संपूर्ण देशात त्यांचे पुण्यस्मरण केले जाते.महाराष्ट्रात तर सर्व हिंदू समाज जातीपातीच्यावर उठून एकत्र येत असतो.गडकोट मोहीमा, किल्ल्याच्या सहली आणि गांवागावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात होतात.त्यामुळे शिवभक्तांचे विघटन करण्यासाठी शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.अर्धवट इतिहास दाखल्याची पिवळी पुस्तके, नाट्य आणि चित्रपटाचा सुद्धा उपयोग केला जातो. ‘
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटक आणि “खालिद का शिवाजी”चित्रपटा द्वारे तरुणांची दिशाभूल केली जाते. शाळा कॉलेज मध्ये सुद्धा सेमिनार भरवून चुकीचा इतिहास प्रस्तुत केला जातो.तसेच गेल्या काही दशकापासून पुरुषोत्तम खेडेकर,श्रीमंत कोकाटे यांनी इतिहासातील अर्धवट आणि सोयीचे दाखले देऊन शिवभक्तां मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.जितेंद्र आव्हाड,अमोल मिटकरी,सुभान अली ही मंडळी सुद्धा इतिहासातील सोयीस्कर दाखले प्रस्तुत करून शिवभक्त तरुणां मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.महाराष्ट्र जेव्हा हिंदू विजयाचा प्रतीक असलेला शिवप्रताप दिन साजरा केला जातो तेव्हा बेगडी जमात अफजलखान आपल्या सत्तेच्या सीमा वाढविण्या साठी महाराष्ट्रात आला होता. शिवरायांच्या सैन्यात प्रचंड मुस्लिम होते.त्यासाठी प्रतापगडाच्या रणसंग्रामात सिद्दी इब्राहिम यांचा दाखला देऊन तो हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता अशा वल्गना केल्या जातात.
वास्तविक पाहता प्रतापगडाचा रणसंग्राम हिंदू विजयाचा इतिहास आहे.जर अफजलखान महाराष्ट्रात आपल्या सत्तेच्या सीमा वाढविण्यासाठी आलाच होता तर त्याने हिंदू मंदिरेच का पाडली होती ?किंवा हिंदू सरदारांचे धर्मांतरण का केले होते?यांच स्पष्टीकरण मात्र दिले जात नाही.त्यामुळे शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून जे काही खोटे कथानक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यास लगाम लावणे आवश्यक आहे.
*अफजलखान ऐवजी सिद्धी इब्राहिम ट्रस्ट का नाही?*
१०नोव्हेम्बर १६५९ रोजी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा प्रतापगढ़च्या पायथ्याशी कोथळा बाहेर काढून त्यास बहाहत्तर हुरा जवळ जन्नत मध्ये कायमचे पाठवून हिंदू विजयाचा इतिहास रचला होता.देव,देश धर्मावर आलेली आक्रमणे किंवा आक्रमकांचा दहशतवाद याच मार्गाने संपवला जाऊ शकतो याचा आदर्श शिवरायांनी देशा समोर ठेवला आहे देश विरोधातील दहशतवादया सोबत याच पध्दतीने वागले पाहिजे अशी स्पष्ट दिशा सुद्धा त्यांनी देशाला दिलेली आहे.परंतू महाराष्ट्रात अफजलखान वध दिवस शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा म्हणजे शिवप्रताप दिन म्हणून उत्सव साजरा केला जातो तेव्हा सुभान अली पासून आपलेच काही बाडगे स्वयंघोषीत विद्वान प्रतापगडाचा रणसंग्राम हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता तर सत्ता संघर्ष होता.सिद्दी इब्राहिमचा उल्लेख करून प्रतापगड रणसंग्रामाला सेक्युलर मुलामा लावण्याचे खोटे कथानक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.वास्तविक पाहता इतिहासाने प्रतापगडच्या रणसंग्रामात सिद्दी इब्राहिम यांचे कर्तृत्व कधीच अमान्य केले नाही आणि आजही कोणी अमान्य करीत नाहीत.परंतू सिद्दी इब्राहिम यांचा उल्लेख शिवरायांचा मावळा असा न करता मुसलमान करणे कितपत योग्य आहे? तसेच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान मेमोरियल ट्रस्ट ऐवजी सिद्धी इब्राहिम ट्रस्ट का करण्यात आले नाही.जुन्या काळी अफजलखान मेमोरियल ट्रस्ट कडून तेथे मोठे अवैद्य बांधकाम करुन अफजलखानाच्या कबीरीचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न झालेला होता.कबरीवर नाक रगडणारी पैदास कोणती होती ?
आताच्या देवेंद्र फडणवीस सरकारने तेथील अवैध अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. अफजलखान उदात्तीकरणाच्या विरोधात जेव्हा शिवप्रेमी,हिंदुत्व विचारकानी अफजलखान कबरीच्या उदात्तीकरण विरोधात आंदोलन करून न्यायलयीन लढा उभा केला होता तेव्हा एकही सेक्युलर पोंगपंडीत उदात्तीकरण विरोधात समोर आला नव्हता. रावणाने अधर्म केला म्हणून आज ही तो जाळला जातो मग हिंदू मंदिरे उध्वस्त करणाऱ्या अफजलखानाचे उदात्तीकरण कशा साठी? तसेच प्रतापगडाच्या पायथ्याशी उदात्तीकरण करतांना महाराष्ट्रातील मुसलमान सिद्दी इब्राहिम सोबत आपलं नात न जोडता अफजलखान सोबत का जोडतो?अफजलखान वधाचे चित्र लावले म्हणून दंगली का घडतात? सप्टेंबर २००९ श्री गणेशोत्सवात सांगली मिरज येथे अफजलखान वधाचे चित्र असलेल्या कमानी वरून दंगल झाली होती. अशा दंगली महाराष्ट्रात का होतात? याची उत्तर सेक्युलर पोंगपंडीत देतील का ?
*शिवभक्तांनीच मुसक्या आवळल्या पाहिजे*
हिंदुस्थान मध्ये मोहम्मद घोरीच्या आक्रमणा पासून शहाजहान पर्यंत हिंदू राजा झाला नव्हता.हिंदू सरदार होऊ ,मनसबदार होऊ शकतो पण राजा होऊ शकत नाही अशा आत्मविस्मृत मानसिकतेच्या काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदुपदपातशाहीची स्थापना करून हिंदू समाजात पुरुषार्थ जागविला होता.पण आता मुळातच सहिष्णू असलेल्या शिवरायांना सेक्युलर व सर्वधर्मसमभावी ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शिवरायांना सेक्युलर आणि औरंगजेब पासून अफजलखानाचे उदात्तीकरण करण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे.त्यामुळे शिवभक्तांनी सेक्युलर पोंगपंडितांच्या मुसक्या आवळून त्यांना उघडे पाडण्याची गरज निर्माण झाली आहे.कारण स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेणारे शिवराय स्वधर्म स्वाभिमानी युगपुरुष होते.म.फुले यांनी शिवरायांनावर लिहिलेल्या पोवड्यात “मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा, रोवला झेंडा हिंदूंचा”असे म्हटले आहे.राजापूर इंग्रज अधिकारी हेन्री रेव्हिंग्टन (Henry Revington)यांनी आपल्या पत्रात शिवरायांचा Generall of Hendoo Forces म्हणजे हिंदूंचा सेनापती असा उल्लेख केलेला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीतील शेवटच्या भाषणात शिवाजी महाराज हिंदूच्या मुक्ततेसाठी लढत होते.परकीय आक्रमणात हिंदू मंदिर उध्वस्त करण्यात आली होती तेव्हा शिवरायांनी गोव्यात श्री सप्तकोटेश्वर मंदिरपासून दक्षिण दिग्विजय मोहिमेत दक्षिण भारत मधील श्री शैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिराची पुनर्बांधणी व जीर्णोद्धार केला होता.स्वधर्म स्वाभिमानी असलेल्या शिवरायांनी महाराष्ट्रात प्रचंड फौजफाटा घेऊन चालून आलेल्या आणि हिंदू मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या अफजलखान रूपी राक्षकाचा भवानी मातेच्या चरणी बळी देऊन दहशतवाद असाच संपवावा लागतो तथा संकट कितीही मोठ असो धैर्य सोडू नका, फौजफाटा कितीही मोठा असो घाबरू नका भगवान श्री कृष्ण निती व गनिमी काव्याने शत्रूचा नायनाट करण्याचा संदेश देणारा शिवप्रताप दिन आहे.
शिवप्रताप उत्सव साजरा करताना शिवकालीन इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे.!
*अशोक राणे*
.९४२३६५८३८५