पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या हिंदू संस्कृतीच्या रक्षणकर्त्या होत्या – डॉ. ओमप्रकाश शेटे 

■ माजलगाव च्या सुलतानपूर येथे लोकमातेची जयंती उत्साहात 

माजलगाव (प्रतिनिधी) :- एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्या खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीच्या रक्षणकर्त्या होत्या, असेे प्रतिपादन डॉ ओमप्रकाश शेेटे यांनी केले. तालुक्यातील सुलतानपूर येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अशोक करे, माजी सभापती दिनेश गायकवाड, ऍड.रविराज बडे, अंकुश मन्नाडे, उत्तम होनमाने, व्याख्याते महेश पिंगळे, गोचडे सर, आप्पासाहेब बडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. संतोष बाबरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून देशभरात मोठे काम उभा केलेले आहे. त्यामुळे त्यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या.

लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यात विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारासाठी व सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून अहिल्यादेवींनी हकीम-वैद्य नेमले.

पु.अहिल्यादेविंनीं हजारो मंदिराचा जीर्णोद्धार केला. सोबतच अनेक तीर्थक्षेत्रावर घाट बांधले. घाट बांधतांना स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी व कपडे बदलण्यासाठी देवींनी ठिकठिकाणी बंदिस्त ओवऱ्या बांधून घेतल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. त्यांच्या कार्यकाळात गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. संतोष बाबरे, बिबीशन केसकर, अजय तिडके, बळीराम पारेकर, बाबुराव केसकर, दत्तात्रय केसकर, शहाजी केसकर, दीपक केसकर आदिसह समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply