Ajay Mishra :ओडिशामध्‍ये अजय मिश्रांच्‍या ताफ्‍यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली ‘अंडीफेक’

[ad_1]

भुवनेश्‍वर: पुढारी ऑनलाईन

केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्रा ( Ajay Mishra  ) यांच्‍या ताफ्‍यावर आज अंडीफेक करण्‍यात आली. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्‍या निषेधार्थ भुवनेश्‍वर येथे एनएसयुआयच्‍या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

केंद्रीय गृहराज्‍य मंत्री अजय मिश्रा हे आज ओडिशा दौर्‍यावर आहेत. सकाळी ते भुवनेश्‍वर विमानतळावर आले. येथून वाहनांनी ते कार्यक्रमस्‍थळी जात होते. यावेळी एनएसयुआयच्‍या कार्यकर्त्यांनी त्‍यांचा ताफा अडविण्‍याचा प्रयत्‍न करत अंडी फेकली. यावेळी लखीमपूर खेरी येथे झालेल्‍या हिंसाचाराचा तीव्र निषेध करण्‍यात आली. अचानक झालेल्‍या प्रकाराने पाेलिसांची तारांबळ उडाली. तसेच काही काळ तणावही निर्माण झाला हाेता.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्‍य २ ऑक्‍टोबर रोजी शेतकरी आंदोलनावेळी वाहनाने आठ जणांना चिरडले होते. मृतांमध्‍ये चार शेतकर्‍यांसह, भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एक पत्रकाराचा मृत्‍यू झाला होता. या घटनेच्‍या निषधार्थ देशव्‍यापी आंदोलनही झाले होते.

हेही वाचलं का?

 

[ad_2]

Source link

Leave a Reply