Ajit Pawar on Not rechebal
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘नॉट रीचेबल’ या वृत्तावर स्पष्टीकरण देताना विनाकारण बदनामी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर वारंवार भेटी होत आहेत. गर्दीत नीट विश्रांती मिळत नव्हती. उष्णतेमुळे आणि योग्य झोप न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली.त्यामुळेच मी दौरा सोडला, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतले आणि पुण्यात माझ्या मेहुण्याच्या घरी आराम करत होतो असा खुलासा नोटरीचेबल प्रकरणावर बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला.
यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “कोणतीही औचित्य नसताना कोणी किती बदनामी करू शकते, याला मर्यादा आहे. आम्ही सार्वजनिक व्यक्ती आहोत, त्यामुळे प्रसारमाध्यमांना आमच्याबद्दल वार्तांकन करण्याचा अधिकार आहे. पण कोणतीही शहानिशा न करता चुकीच्या बातम्या दिल्या जातात. अशा प्रकारे बातम्या चालवणे योग्य नाही.
खात्री करूनच बातम्या चालवा असा सल्ला अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिला.प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याबद्दलच्या बातम्या पाहून दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे येथे एका नियोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.