गौतमी पाटीलला लग्न करायचंय, पण…

Sabse Katil Goutami Patil

Gautami Patil Marriage: सेलिब्रिटी लोकांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो.मागच्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिच्या शोदरम्यान तरुणांची हुल्लडबाजी, गोंधळ व त्यानंतर पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद हे समीकरण आता नित्याचे झाले आहे. गौतमीला महाराष्ट्राची सपना चौधरी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”सबसे कातील गौतमी पाटील…” हे शब्द तरुणांच्या ओठावर आहेत.

अशा लोकप्रिय डांसर बाबतीत जाणून घेण्यास तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.गौतमीचे लग्न झाले असेल का, तिचे कोणाबरोबर अफेअर असेल का?अशा बाबींची उत्तरे मिळवण्यासाठी तिचे चाहते नेहमीच प्रयत्नशील असतात.आजवर गौतमीने सुद्धा काही मुलाखतींमध्ये आपले आई- वडील, शिक्षण या विषयी सांगितलेलं आहे.आता पहिल्यांदाच गौतमी ने आपल्या लग्ना बाबत भाष्य केलं आहे.गौतमीने आपली लव्ह स्टोरी व तिच्या स्वप्नातील राजकुमार कसा असावा हे प्रथमच सांगितलं आहे.

 

Sabse katil गौतमी पाटील ने नुकतेच एका यूट्यूब चैनल ला मुलाखत यावेळी तिला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला असता तेंव्हा तिने “हो मला लग्न करायचं आहेच!” असे ती लाजत मुरडत म्हणाली.

पुढे बोलताना ती म्हणाली की, “मी लहानपणी मुलींच्या शाळेत होते, बाबा सोडून गेल्यावर घरी कोणीच पुरुष नव्हता, ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. यानंतर पण कधीच कोणत्या पुरुषाशी वैयक्तिक असा संबंध आला नाही. अशावेळी आता घरातल्या जबाबदाऱ्यांचा निदान अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असावा अशी इच्छा आहे. म्हणून मला लग्न करायचंय.”

गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सुद्धा सांगितल्या. ती म्हणते की, “मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा कशाची गरज नाही पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा माझा जोडीदार हवा आहे. त्यामुळे असा मुलगा जेव्हा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन.”असं गौतमी ने मुलाखती दरम्यान सांगितलं. लवकरच ती मराठी चित्रपटात झळकणार आहे.

Leave a Reply