Amit Shah यूपीत म्हणाले, २०२४ ला मोदींना पंतप्रधान करायचे तर…

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पहायचे असेल तर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा संधी द्या, असे आवाहन गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी उत्तर प्रदेशात बोलताना केले.

२०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून भाजपाच्या मेगा सदस्यत्व मोहिमेसाठी आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी लखनौ येथे एका मेळाव्यात शहा यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही उत्तर प्रदेशातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली.

उत्तर प्रदेशला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी अजून पाच वर्षांची गरज आहे. पंतप्रधान मोदी हेदेखील उत्तर प्रदेशचे खासदार आहेत. जर तुम्हाला त्यांना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर २०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांना पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री बनवावे लागेल. मला खात्री आहे की तुम्ही २०२४ मध्ये पीएम मोदींना पुन्हा संधी द्याल.’

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर शहा यांनी हल्लाबोल केला. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीची तारीख भाजपाचे लोक जाहीर करणार नाहीत, अशी टीका अखिलेश यादव यांनी म्हटले होते. यावर ते म्हणाले, ‘ मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांच्याच सरकारने रामभक्तांना गोळ्या घातल्या होत्या. आमच्या राजवटीत लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होणार आहे. आत्ता उत्तरप्रदेश अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना महामारीच्या काळात योगी आदित्यनाथ यांनी २२ कोटी जनतेची काळजी घेतली. त्यांनी उल्लेखनीय काम करत लोकांचे प्राण वाचवले.

Amit Shah : यूपीला सपा, बसपाने खेळाचे मैदान बनवले

शहा म्हणाले, ‘सपा आणि बसपा सरकारने अनेक वर्षांपासून यूपीला त्यांचे खेळाचे मैदान बनवले होते. लोक यांना कंटाळून राज्यातून पलायन करत होते. मात्र, आज परिस्थिती बदलली असून यूपीमध्ये रात्री १२ वाजताही दागिने घालून स्कूटी चालवू शकतात. आमच्या कार्यकाळात गरिबांना पक्की घरे आणि वीज देण्यात आली.’

हेही वाचा : 

[ad_2]

Source link

Leave a Reply