‘अमृत’च्या लक्षित गटातील युवकांना मिळ्णार MKCL संस्थेमार्फत संगणक कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना कोणताही विभाग /संस्था अथवा महामंडळ यांचे मार्फत लाभ मिळत नाही अशा युवकांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वावलंबनाला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी ‘अमृत’ आणि MKCL यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

या करारा अंतर्गत MKCL मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही  निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना निवड झाल्यावर लाभ देण्यात येईल. ‘अमृत’ तर्फे प्रशिक्षणसाठी निवड झालेल्या युवकांना MKCL च्या नियमानुसार सुरुवातीस  सुरक्षा शुल्क स्वतः भरावयाचे आहे. योजनेच्या पात्र लाभार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या प्रशिक्षणचे शैक्षणिक शुल्क अमृत संस्थेमार्फत MKCL संस्थेस परस्पर दिले जाईल. यासंबंधी सर्व माहिती अमृतच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

या  सामंजस्य कराराच्यावेळी MKCL च्या  व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वीणा कामथ,  सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. समिर पांडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. अमित रानडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक अतुल पाटोदी, उप-महाव्यवस्थापक डॉ.दीपक पाटेकर आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. उदय लोकापल्ली तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. महेश वाघचौरे उपस्थित होते.  अमृतच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply