अतिकच्या वैचारिक नातेवाईकांची खंत.

पवन मोगरेकर

बीड मधील लोकाशा नावाचे एक स्थानिक दैनिक अतिक व अश्रफ अहमदच्या हत्येने खूप व्यथित झाले.अतिक,अहमद ची हत्या म्हणजे डेथ ऑफ डेमोक्रेसी असून देशात मोदींच्या नेतृत्वात लोकशाहीचा गळा घोटाळा जात असल्याचा साक्षात्कार या दैनिकाच्या संपादकाला झाला.या लेखाचा मथळा ते हिंदू नाहीत तर गांडू आहेत असा ठेवण्यात आला.दुसऱ्याच दिवशी माजलगावातील मोहसीन पटेल नावाच्या व्यक्तीने या संपूर्ण लेखाचे बॅनर तयार केले व यावर अतिक अहमदचा उल्लेख शहिद असा करून त्याला जन्नत मधे जागा द्यावी अशी मागणी त्याने अल्ला कडे केली. शहरातील जागरूक हिंदुत्वत्वादी संघटना आक्रमक झाल्यावर गुन्हे दाखल होऊन काही व्यक्तींना अटकही झाली परंतु या निमित्ताने देशातील हिंदुत्व विरोधी पत्रकारांची इकोसिस्टम कशी कार्य करते हे समोर आले.

अतिक व अश्रफ काही संत मंडळी नव्हते, त्यांच्यावर हत्ये पासून बलात्कारा पर्यंतचे जेवढे कलमं असतील तेवढे होते. त्यांची हत्या होताच देशातील ठराविक लॉबीला पुरोगामी जुलाब सुरू झाले. या लॉबीच्या दृष्टीने उमेश पालची हत्या डेथ ऑफ डेमोक्रेसी ठरत नसते,राजस्थान मधील निष्पाप टेलर कन्हैयालालची हत्या,पालघर मधील साधू पासून अमरावती मधील उमेश कोल्हेची हत्या त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक प्रकरण असते परंतु या लॉबीचा वैचारिक पिता अतिक व अश्रफची हत्या ही डेथ ऑफ डेमोक्रेसी ठरते.विशेष म्हणजे इतर प्रकरणात आरोपींच्या धर्मावरून त्यांना मोकळीक मिळत असताना अतिकची हत्या करणाऱ्यांची थेट लग्न कुंडलीच बाहेर कशी येते?यावरून हिंदुत्व विरोधी लॉबी कश्या प्रकारे काम करतं आहे हे लक्षात येईल. हत्या करणाऱ्यांचा धर्म हिंदू असणं एवढंस कारणं या लॉबीला पुरेस असतं. यापूर्वीही मुंबई हल्ल्याला वेगळी दिशा देण्याचा या लॉबीचा प्रयत्न मीडिया मधील काही जागरूक पत्रकारांमूळे हाणून पाडण्यात आला होता हे विशेष.

पोलिस संरक्षणात झालेली ही काही पहिली हत्या नाही.झेड दर्जाची सुरक्षा यंत्रणा असताना या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी,पंजाब चे मुख्यमंत्री बेअत सिंग यांच्याही हत्या झाल्या. या हत्येला कुणी डेथ ऑफ डेमोक्रेसी ठरवत नाही कारण जेंव्हा काँग्रेस सत्तेत असते तेंव्हा या इकोसिस्टम साठी ती ईश्वरी सत्ता असते.

कधी नव्हे ते देशातील हिंदूंना हिंदू विरोधी इकोसिस्टिम समजली आहे. छोट्याश्या घटनेवरून थेट हिंदू धर्माला टार्गेट कारणाऱ्यांचे मनसुबे हिंदूंनी ओळखले आहेत.केवळ 15 मिनिटे पोलीस बाजूला करा म्हणणाऱ्यांना वैचारिक समर्थन देणाऱ्या इकोसिस्टमचे पोलीस कुठे गेले होते हा प्रवास अफलातून आहे तो देशातील बहुसंख्य हिंदूंनी ओळखल्यामुळे त्यांचा प्रत्येक वार निष्प्रभ होत आहे   हीच अतिकच्या या सर्व वैचारिक नातेवाईकांची खंत आहे.

Leave a Reply