महाराष्ट्रातील जैष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकरांचे वृद्धपकाळाने (90) निधन झाले आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून महाराष्ट्र ते कीर्तन सेवा करत होते. धीर गंभीर आवाजातील त्यांचे कीर्तन ऐकताना भाविक भान हरपून जात.महाराष्ट्राला किर्तनकारांची थोर परंपरा आहे त्यात बाबा महाराज सातारकरांची एक वेगळी शैली होती.त्यांच्या सुमधुर आवाजातील हरिपाठ हा श्रवणीय होता. त्यांच्या घरात चार पिढ्यां पासून कीर्तनाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर यांची पुढची पिढीही किर्तन सेवेत सक्रिय आहे हे विशेष. त्यांच्यावर मूळ गावी उद्या सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.