संत बाळूमामा मंदिर व्यवस्थापन समिती विसर्जित करा: आ.गोपीचंद पडळकर

मुंबई: संत बाळूमामांच्या लौकीकाला धक्का लावण्याचं काम आदमापूरची देवस्थान समिती करतेय. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत करावी. शासनाने समिती नेमून धर्मादाय कायदा आणावा व धनगर समाजाला समितीत प्रतिनिधित्व द्यावं, अशी मागणी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

या बाबत अधिक माहिती अशी की, श्री क्षेत्र आदमापुर (ता.भुदरगड जि.कोल्हापूर) येथे संत बाळूमामा यांचे भव्य मंदिर आहे.महाराष्ट्र, कर्नाटक व देशभरात संत बाळूमामा यांचे लाखो भक्त आहेत. त्यामुळे आदमापूर येथे नेहमी भक्तांची गर्दी असते. मोठया प्रमाणावर देणग्या गोळा होतात.मात्र, येथील मंदिर व्यवस्थापन समिती भक्तांची कसलीही सोय करत नाही. मंदिराची स्थावर व जंगम मालमत्ता ओरबाडून खाण्यातच विश्वस्त मंडळ व्यस्त आहे.भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येवूनही मागील सरकारने यावर कसलीही करवाई केली नाही. त्यामूळे मंदीर विश्वस्त मंडळ विसर्जित करून त्यावर स्थानिक व धनगर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.

Leave a Reply