समृद्धी महामार्गावर लोक देवेंद्रवासी होतात- शरद पवार

समृद्धी महामार्गावर मृत्युमुखी पडलेले लोक देवेंद्र वासी होतात असा घनाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. काल समृद्धी महामार्गावर एका खाजगी बस ट्रॅव्हलच्या अपघातात होरपळून 25 लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले असून या अपघातात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी घातक ठरत असून जागतिक पातळीवरील रस्त्याची गुणवत्ता यासाठी कारणीभूत असून या महामार्गावर प्रवास करताना चालकांना स्वतःच्या गाडीचा वेग नियंत्रणात ठेवता येत नसल्याने अपघातांची मालिका वाढत आहे दरम्यान काल घडलेल्या अपघातावरून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना समृद्धी महामार्गावर मृत्युमुखी पडलेले लोक देवेंद्र वासी होतात असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

Leave a Reply