सर्वसामान्यांना आपलं मानलंय;नेतृत्व रक्तात भिनलंय:ज्ञानेश्वर नाना मेंडके

कुटुंबामध्ये कसलाही राजकीय वारसा नसताना केवळ स्वकर्तुत्वाने पुढे आलेले व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वर नाना मेंडके होय…सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी सदैव राहणारे गेल्या तीन दशकापासून अविरतपणे उत्तमपणे समाजकारण आणि राजकारण करणारे सदैव प्रसन्न दिसणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वर नाना मेंडके….

 

शिवसेनेमध्ये तालुकाध्यक्ष असताना माजलगाव सह संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय ताकतीने शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते , तालुका प्रमुख असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे उभे राहून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला .तहसील कार्यालयामध्ये कोणाचे काम असेल,पोलीस स्टेशन मध्ये असेल पंचायत समिती मध्ये असेल तलाठी कार्यालय मध्ये असेल अशा विविध शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये गरीब गरजू वंचित अशा असंख्य सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या वेळी सदैव पाठीशी राहून सहकार्य केले. कालांतराने नानांनी शिवसेनेनंतर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करून भाजपामध्ये काम सुरू केले.

भाजपा मध्ये देखील नानांनी पक्ष वाढीसाठी व सर्वसामान्य लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. सर्वसामान्य गरजू गरीब वंचित लोकांच्या नाना पाठीशी राहत असल्यामुळे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब नानांना खूप मानत व त्यामुळेच लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे नाना हे विश्वासू सहकारी म्हणून तर होतेच त्या सोबत नाना मुंडे साहेबांचे कौटुंबिक सदस्य म्हणून देखील पहावयास मिळत होते व आत्ता लोकनेत्या पंकजाताई व खासदार प्रीतम ताई यांचे देखील मुंडे साहेब इतकेच सलोख्याचे कौटुंबिक संबंध असताना दिसतात . नाना आज देखील शेकडो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करत असताना त्यांना न्याय देण्याचा देखील नानाने प्रयत्न केला .आपल्यासोबत जो कार्यकर्ता पदाधिकारी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करतो त्यांच्यासाठी संघर्ष करतो त्यांना न्याय मिळवण्यासाठी मोर्चे आंदोलने करतो अशा कार्यकर्ते सोबत नाना सदैव पाठीशी राहताना दिसतात .अशा संघर्ष करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अशावेळी त्यांना विसरून देखील चालणार नाही हा विचार करत त्यांनी स्वतः कधी पदाचा विचार केला नाही पण अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवकाची उमेदवारी असेल सरपंच पदाची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील विविध उमेदवारी असेल ती देऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून अनेक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, हे करत असताना ज्याही पक्षात नाना काम करतात त्यावेळी त्या पक्षाची विचारधारा नुसार नाना कार्य करतात ,जो व्यक्ती आपला कार्यकर्ता तर आहेच पण पक्षाचे देखील काम करतो अशा व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्या कार्यकर्त्याला कधीही व्यक्तीनिष्ठ न बनवता तो कार्यकर्ता पक्षाची विचारधारा म्हणणारा पाहिजे व पक्षनिष्ठा जपणारा पाहिजे अशी भावना ठेवत त्यांनी आजतागायत प्रामाणिकपणे कार्य केले , नानांनी पैसा किती कमवला पदांनी किती मोठे झाले यापेक्षा समाजामध्ये अनेक सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले .चांगल्या व्यक्तींना काम करण्यासाठी अनेकांना मोठे करण्यासाठी त्यांनी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना संधी दिली त्यातील अनेक व्यक्तींनी संधीचे सोने केले व आजही ते नानाला विसरलेले नाहीत . त्यामुळे त्यांनी आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्त्याचा विचार केला आहे हे गेल्या तीन दशकापासून दिसून येते .

आपण जबाबदार पदाधिकारी असताना किती लोकांना , पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो हे नानाकडे पाहताना दिसते. आयुष्यात आपल्याकडे विविध पदे असताना सर्वसामान्य व्यक्तींचे किती कामे केले , किती व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते . नाहीतर आपण केवळ पदांनी पैशांनी किती मोठे झालो समजणारे अनेक पदाधिकारी कार्य कर्त्याची आज जनसामान्यांमध्ये त्यांची काय किंमत आहे हे सर्वांनाच दिसत आहे . कोणत्याही व्यक्तीचे कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्याचे मन दुखवणार नाही याची नाना नेहमी काळजी घेताना दिसतात. अशा अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी पडद्यामागून डायरेक्टरची भूमिका बजावत अनेकांना हिरो करणारे, नाना या नावाप्रमाणे नानांना कुठलेही कोणीही काम सांगितले तर ते काम नाही न म्हणता ते काम करण्यासाठी प्रयत्न करतात आणि म्हणूनच कधी नाही हा शब्द त्यांच्या स्वभावात ,,वागण्यात ,मनात नसल्यामुळे नाना हे नाव शोभले जाते . पदाच्या माध्यमातून कुठलीही चुकीचे काम मी करणार नाही व त्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेताना नाना हे नेहमी दिसतात . प्रति वर्षे प्रमाणे या वर्षी देखील कुठलीही बॅनरबाजी , भपकेबाजी न करता विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे . असे आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठपणे कार्य करणारे , प्रखर हिंदुत्ववादी विचारधारा असणारे , अष्टपैलू नेतृत्वास ,व सामाजिक भावनेतून कार्य करणारे श्री ज्ञानेश्वर नाना मेंडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,तुमच्या हातून असेच अविरत कार्य घडत राहो दीर्घायुष्य लाभो हीच श्री रेणुका माता चरणी प्रार्थना…

-विनायक रत्नपारखी (नगरसेवक माजलगाव न. प.)

Leave a Reply