नागपूर येथे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन – बंडू खांडेकर

माजलगाव, दि.१७ (प्रतिनिधी):- भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन गुरुवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिवेशनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर यांनी केले आहे.
भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे होणाऱ्या भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव येथे पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी बंडू खांडेकर बोलत होते. बैठकीस भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, जिल्हा सचिव बबनबाप्पा सोळंके, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर मेंडके, युवाचे गणेश मुंडे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, युवा जिल्हाध्यक्ष नारायण मेंडके, संजय पवार, दत्ता लबासे, शरद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करुन बैठकीस सुरुवात झाली.


भाजप भटके विमुक्त आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ भगवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सहकारमंत्री ना.अतुल सावे, माजी खा. डॉ. विकास महात्मे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकुजी दादा विधाते, विश्वास पाठक, अतुल वझे, रामेश्वर नाईक यांची उपस्थिती राहणार आहे.
सदरील अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय व चर्चा होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी, तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी प्रदेश उपाध्यक्ष अशोक चोरमले, सरचिटणीस गोविंद गुंजाळकर, डॉ.उज्वलाताई हाके, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डॉ.उज्वलाताई दहिफळे, जिल्हाध्यक्ष डॉ.लक्षण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त आघाडीचे महिला, युवक, युवती विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply