मंत्र्यांच्या मुलांना तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय. एक परिवार एक उमेदवार…..

राजकारणातील घराणेशाही हा नेहमीचं चर्चेचा विषय राहिला आहे. घराणेशाही नसलेला पक्ष म्हणून भाजपची ओळख राहिलेली आहे यापुढेही ही ओळख कायम रहावी तसेच पक्ष कार्य करणाऱ्या केडरला संधी मिळावी यासाठी मोदींनी घराणेशाहीवर सर्जिकल स्ट्राईक केल असून मंत्र्यांच्या कुटुंबातील कुणालाही आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट देणार नसल्याचा निर्णय आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत घेतला गेला आहे.

एकाच कुटुंबातील अनेक जण राजकारणात सक्रिय असतात तसेच खासदारकी, आमदारकी यासह इतर अनेक सत्ता केंद्र एकाच कुटुंबात एकवटल्याचे अनेक उदाहरणे आहेत. सुरवतीपासून भाजप पार्टी विथ डिफरन्स पक्ष राहिलेला आहे अटलजी, अडवाणी, मोदी, गडकरी यांच्यासह भाजपमधील अनेक नेत्यांची मुले व कुटुंबीय राजकारण सोडून इतर क्षेत्रात सक्रिय असल्याचे पहायला मिळते परंतु काँग्रेस मधील अनेक नामवंत घराण्यांनी भाजप मधे प्रवेश केल्याने भाजपची मूळ ओळख थोडी धोक्यात आल्याचे जाणवते यासाठी मंत्र्यांच्या मुलां सहित कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट देणार नसल्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असून इथून पुढे एक परिवार एक उमेदवार या धोरणावर भाजप वाटचाल असणार आहे.

Leave a Reply