[ad_1]
आपल्या देशात अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. यातील काही परंपरा आपल्या जगण्यातल्या भाग झाल्या आहेत. तर काही काळाच्या ओघात दुर्मिळ होत आहेत. दिवाळी निमित्त अशाच एका परंपरेमुळे छतीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ( Chhattisgarh ) चर्चेत आले आहेत. त्यांनी थेट चाबकाचे फटके आपल्या हातावर घेत ही परंपरा जोपासली. जाणून घेवूया छत्तीसगडमधील या अनोख्या परंपरेबद्दल…
उत्तर भारतात गोवर्धन पूजेची प्राचीन पंरपरा आहे. दिवाळी सणाच्या दुसर्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. छत्तीसगडमध्ये ही परंपरा थोड्या वेगळ्या पद्धतीने पार पाडली जाते. मुख्यमंत्री भूपेश बघेल ( Chhattisgarh) यांनी शुक्रवारी सकाळी जंजगिरी गावात आपल्या हातावर चाबकाचे फटके मारुन घेतले. सर्व काही मंगल व्हावे, शुभकार्यात कोणताही अडथळा येवू नये यासाठी कुशापासून तयार केलेल्या चाबकाचे फटके मारले जातात. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अंगावर जंजगिरी गावचे ग्रामस्थ बिरेंद्र ठाकुर यांनी चाबकाने फटके मारले.
( Chhattisgarh) गोधना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
गोवर्धन पूजा झाल्यानंतर ही परंपरा पाळली जाते. ही पूजा गोधना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळली जाते. तसेच चाबकाचे फटके मारले की, राज्याच्या सुख-समृद्धी नांदते, नागरिकांवरील सर्व संकटांचा नाश होतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
मी नेहमीच या सोहळ्याची वाट पाहतो
यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, यापूर्वी चाबकाने पटके मारण्याची परंपरा भरोसा ठाकुर यांच्याकडे होती. आता त्यांचे पुत्र बीरेंद्र ठाकुर संभाळत आहेत. गोवंश समृद्ध झाला तरच आपल्या सर्वांची प्रगती होईल. त्यामुळेच छतीसगडमधील ग्रामीण भागात गोवर्धन पूजा खूपच लोकप्रिय आहे. आमच्यासाठी गोधना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. अशा परंपरामुळेच जीवनामुळे नवा उत्साह येतो. मी नेहमीच या सोहळ्याची वाट पाहतो. याप्रसंगी मी छतीसगड राज्य प्रगतीपथावर रहावे, यासाठी प्रार्थना करतो, असेही बघेल यांनी नमूद केले.
[ad_2]