डेटा हे सोशल मीडियाचे मिसाईल:देवेंद्र फडणवीस

मुंबई, (डी. अशोक): माहिती (डेटा) हे सोशल मीडिया चे मिसाईल आहे.राजकीय लोकांनी सोशल मीडियाची ताकद समजून घ्यावी. जे लोक याकडे दुर्लक्ष करतील ते भविष्यात राजकिय प्रवाहाच्या बाहेर पडतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

येथील वानखेडे स्टेडियमचे गरवारे क्लब हाऊस येथे आयोजित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संवाद कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त तसेच आगामी लोकसभा निमीत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर,आमदार आशिष शेलार, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, श्वेता शालिनी,ओएसडी निधी कामदार, भाजप सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाश गाडे, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन आदींची उपस्थिती होती.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्याशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, येणारे वर्ष हे भाजपसाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचे आहे. मोदींनी आपल्या कुशल नेतृत्वाने देश एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला आहे.वितरण व्यवस्था बदलल्याने भ्रष्टाचार संपला आहे.विकासाचा हा वेग असाच कायम ठेवायचा असेल तर सोशल मीडिया मीडिया योध्यांनी गाफील न राहता लढाईसाठी सज्ज राहावे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या अंधकारमय काळात सोशल मीडियावरील योध्यांना जाणीवपूर्वक प्रचंड त्रास देण्यात आला. प्रचंड त्रास सहन करूनही हिंदुत्व आणि पक्षाची बाजू लावून धरणाऱ्या या सोशल मीडिया वीरांना मी शालूट करतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

यावेळी मुंबई विभाग संयोजक धनंजय वागस्कर, मराठवाडा संयोजक साईनाथ शीरपुरे आदीसह राज्यभरातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते.

Leave a Reply