दत्ता महाजन यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

 

 

 

माजलगाव (प्रतिनिधी): भाजपा मराठवाडा सोशल मीडियाचे सहसंयोजक दत्ता महाजन यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप तसेच प्रोटीन पावडरचे वाटप केले सकाळी दहा वाजता ग्रामदैवत सिद्धेश्वराचे दर्शन करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन केले. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील महाजन यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला .

झेंडा चौक साठे नगर भागातील जिल्हा परिषद शाळेत 30 लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करून 30.प्रोटीन पावडरचे वाटप केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक राठोड सर घनगाव सर भाजप युवा नेते अभय होके पाटील उपनगराध्यक्ष दीपक मेंडके व्यंकटेश महाजन दत्ता गजमल सुमित कुलकर्णी वेदांत महाजन तसेच मित्रपरिवार व शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी अभय होके यांनी त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच यावेळी नगरसेवक विनायक रत्नपारखी बोलताना म्हणाले कोरोनाच्या संकट काळात देखील महाजन यांनी अनेक गरजू गरीब लोकांना आर्थिक मदत व किराना किट वाटप केले होते. तसेच अनेक वेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आर्थिक मदत केली दत्ता महाजन हे अनेक वर्षापासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात.भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर चालत समाजातील अंतिम घटकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून आपण समाजाच देन लागतो व सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून ते सामाजिक काम करतात त्याबद्दल त्यांचा खूप अभिमान वाटतो , यावेळी शाळेतील मुख्याध्यापकांनीही सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले व त्यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. महाजन यांना वाढदिवसानिमित्त खासदार प्रीतम मुंडे , मा आमदार श्री सुरजीत सिंह ठाकुर , मा आमदार आर टी देशमुख भाजपा नेते रमेश आडसकर ,मोहन जगताप डॉक्टर प्रकाश आनंदगावकर ओमप्रकाश शेटे राम कुलकर्णी अशोक होके पाटील नितीन नाईकनवरे शेख मंजूर डॉ स्वानंद कुलकर्णी रा स्व संघ कार्यवाह जगदीश साखरे जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर रत्नपारखी प्रशांत पाटील भा शि प्र चे प्रशासकीय अधिकारी प्रशांत भानप आनंत शास्त्री जोशी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच आडसकर यांच्या निवासस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत बीड जिल्हा सचिव बबन सोळंके मा नगराध्यक्ष अशोक तिडके नगरसेवक विनायक रत्नपारखी छबन घाडगे सत्यनारायण उनवणे सूर्यकांत दराडे बाळासाहेब क्षिरसागर अर्जुन पायघनण संतोष जाधव व उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाजन यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा केला तसेच शहरातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व पत्रकार उमेश मोगरेकर कमलेश जाबरस प्रदीप कुलकर्णी उमेश जेथलिया राज गायकवाड शिवा सेठ भुतडा राम जगताप तसेच वैद्यकीय क्षेत्रातील स्नेहबंध ग्रुप विविध सामाजिक संघटनेतील व्यक्तींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply