देवेंद्र फडणवीसांची मध्यस्ती दोघांतील वाद मिटणार?

सातारा प्रतिनिधी

काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडमध्ये दाखल झाले होते कराडमध्ये दाखल झाल्यानंतरआज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा उदयनराजे भोसले यांची बैठक घेतली त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत फडणवीस यांनी चर्चा केली या दोघांसोबत चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोघांसोबत संयुक्त बैठक घेतली असून ही बैठक तब्बल दोन तास चालली आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील या दोन महत्त्वाच्या नेत्यांमधील वाद भाजपला परवडणारा नाही या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याने देवेंद्र फडणीस यांची मध्यस्थी यातून तोडगा काढेल काय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे दरम्यान काल झालेल्या प्रकरणावरून खा. उदयनराजे भोसले यांच्यासह 45 व्यक्तींवर भूमिपूजन कार्यक्रमात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे

Leave a Reply