धनगर समाज संघर्ष समितीच्या राज्यव्यापी बैठकीचे शिर्डी येथे आयोजन

अहील्यानगर(प्रतिनिधी): धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य विभागिय, अध्यक्ष जिल्हा, अध्यक्ष तालुका अध्यक्ष व गांव पातळीवरील सर्व पदाधिकारी व समाजबांधव यांची राज्यव्यापी आढावा बैठक धनगर समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.रविवार, दि. 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता शिर्डी येथे आयोजित केली आहे.

 

या राज्य बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. धनगर आरक्षण अंमलबजावणी व मेंढी चराई क्षेत्र बाबत चर्चा,धनगर समाज संघर्ष समिती पदाधिकारी वार्षिक पुर्नगठन,धनगर समाज संघर्ष समिती विस्तार व कार्याचा आढावा,1000 कोटीच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या विवीध योजना व निधीबाबत चर्चा तसेच अध्यक्ष यांचे परवानगीने येणारे विषय आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. सदर बैठक हॉटेल के बी एस ग्रँड, शिर्डी , जि. अहील्यानगर येथे होणार आहे. या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन बापूसाहेब शिंदे प्रदेश अध्यक्ष, हरीश खुजे- राज्यसचिव यांनी धनगर समाज संघर्ष समिती , महाराष्ट्र राज्य चे वतीने केले आहे.

Leave a Reply