उर्फी जावेद vs चित्रा वाघ लढाईत…

मुंबई: ‘नंगे से खुदा डरे’ अशी एक म्हण प्रचलित आहे. याची पुरेपूर प्रचिती भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना आली म्हणायला हरकत नाही.

 

अभिनेत्री उर्फी जावेद सार्वजनिक ठिकाणी नेहमीच अत्यंत तोकड्या व अश्लील कपड्यात वावरत असते. यावरून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद ला डिवचले असता उर्फी जावेदनेही तेवढाच आक्रमक पवित्रा घेत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तरे देण्यास सुरुवात केली. यामुळे चित्रा वाघ काहीशा बचावात्मक पवित्र्यात गेल्या परंतु सुसाट सुटलेली उर्फी जावेद मात्र काही केल्या थांबायला तयार नसल्याचे दिसते. त्यात आणखी भर म्हणजे महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही रूपालीची पाठराखण करताना चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे उर्फी जावेद मात्र दररोज नवनवीन करून चित्रा वाघ यांना डिवचत आहे.

उर्फी जावेद आपल्या ट्विट मध्ये म्हणते,

“चित्राताई मेरी खास है, फ्युचर मे होने वाली मेरी सास है”

“मेरी डीपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू”

“उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी ग तू सास”

अशाप्रकारे दररोज नवनवीन ट्विट करून चित्रा वाघ यांना डीवचून आव्हान देत असताना चित्र वाघ मात्र काहीशा बचावात्मक पवित्र्यात गेल्याचे दिसून येते. बरेच दिवसानंतर काल चित्रा वाघ यांनी एक पत्रकार परिषद घेऊन उर्फ जावेदला उत्तर दिले.हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही हा जुनाच इशारा त्यांनी पुन्हा उगाळला. उर्फी जावेदने सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन करून नियम भंग केल्याची तक्रार चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस कडे दाखल केलेली होती. मात्र, सदर तक्रारीवर अद्याप पोलिसांनी काहीही पाऊल उचलले नव्हते. परंतु,काल पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवून आज दिनांक 14 जानेवारी रोजी अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. तर उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्याविरुद्ध महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यातील लुटूपुटूच्या लढाई वरून सोशल मीडियावर सुद्धा मजेदार मिम शेअर होत आहेत. उर्फी जावेद vs चित्रा वाघ लढाईत उर्फी जावेद चार पॉईंट ने पुढे असल्याचे एकाने म्हंटले आहे.

लुटूपुटू ची लढाई थांबवून शेतकरी, महिला यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, संजय राठोड प्रकरणाचे काय झाले? असे प्रश्न नेटझन कडून उपस्थित होत आहेत. एकंदरीत उर्फी जावेद vs चित्रा वाघ लढाईत उर्फी जावेदने बाजी मारल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

Leave a Reply