पंकजा मुंडेंच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड! 

मुंडे बंधू-भगीणीची दिलजमाई?

परळी वैद्यनाथ: पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बंधू-भगीणीची दिलजमाई झाली आहे का? यावरून बीड आणि मराठवाड्यातील जनतेत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. कारण पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे यांची आश्रयदाता सभासद गटातून बिनविरोध निवड झाली आहे.

 

भराजवाडी येथे पार पडलेल्या नारळी सप्ताह प्रसंगी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी आपल्यातील राजकीय वैर संपले ची घोषणा केली होती. तसेच पंकजा मुंडे यांनी मतदारसंघ बदलण्याच्या बाबतीतही संकेत दिले होते. यामुळे धनंजय मुंडे यांच्या निवडीला महत्त्व आले आहे.

12 वर्षानंतर संस्थेसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 34 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यातील एक जागेसाठी आश्रयदाता सभासद गटातून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड झाली आहे. या सोसायटीसाठी 6 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर 7 मे रोजी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संपवून खरेच दिल जमाई झाले की नाही हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.

Leave a Reply