[ad_1]
देशभरात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त गुजरातमधील प्रमुख औद्योगिक शहर सूरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिल्या आहेत. गुजरातमधील प्रमुख औद्योगिक शहर सूरत येथील अलायन्स ग्रुपचे संचालक सुभाष दावर यांनी ही भेट दिली आहे. (Diwali Bonus)
यावेळी अलायन्स ग्रुपचे संचालक सुभाष दावर म्हणाले की, वाढत्या इंधनाच्या किमती आणि इतर बाबी लक्षात घेऊन आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Diwali Bonus : कंपनीच्या ३५ कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटरचे वाटप
याचबरोबर दावर यांचा मुलगा चिराग म्हणाला की, या दिवाळीत कंपनीने ३५ कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर दिल्या आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक्सच्या बदल्यात आम्ही नवीन उपक्रम म्हणून इलेक्ट्रिक बाइक्स दिल्या आहेत.
इंधनाची दरवाढ पाहता, कंपनीने पेट्रोल बाईक चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्याचा निर्णय घेतला. यामुळे इंधनावरील खर्च तर वाचेलच, पण पर्यावरणाचेही रक्षण होईल. असा दुहेरी विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांमध्ये या स्कूटर्सचे वाटप करण्यात आले.
खासदार सी. आर. पाटील यांच्या हस्ते उदघाटन
अलायन्स एम्ब्रॉयडरी प्रायव्हेट लिमीटेड ही खासगी कंपनी आहे. ३ मार्च २००५ रोजी स्थापन झाली आहे. कामगारांचे हीत पाहणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. गुरूवार, (दि. ४) ११ वाजता अलायन्स हाऊस, सोसिओ सर्कल उधना मगदल्ला रोड येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, खासदार सी. आर. पाटील यांच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटरचे वाटप करण्यात आले.
[ad_2]