ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन मिळवा 80% अनुदान!

‘येथे’ करा अर्ज; अशी आहे प्रक्रिया…

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेतीतील उत्पादन वाढावे, शेतीतून अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने भारत सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आखत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात व शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे हा ही एक उद्देश आहे. शेतकरी बंधू-भगिनींनो आज आमची टीम आपल्यासाठी अशाच एका योजनेची माहिती घेऊन आली आहे.

MSSY: मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना- ठिबक सिंचन Mukhyamantri Shaswat Sinchan Yojna 2023

राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक

काय आहे योजनेचा उद्देश: 

 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व पिकाच्या उत्पादनात वाढ करणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे, सिंचनाखालील लागवडी योग्य क्षेत्रात वाढ करणे इत्यादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने या योजनेची आखणी केलेली आहे.

 

कोणाला घेता येईल लाभ/पात्रता: 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व खातेदार शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसून घेऊ शकतात. मात्र यापूर्वी त्याच शेती क्षेत्रावर मागील ७ वर्षात ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

आवश्यक कागदपत्रे: 

 

१) सातबारा व ८ अ चा उतारा

२) पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र

३) जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी)

४) आधार कार्ड

५) पॅन कार्ड

६) बँक पासबुक झेरॉक्स

 

किती मिळेल अनुदान?

या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८०% व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ७५% अनुदान मिळते.

येथे करा अर्ज: 

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक खाली देत आहोत किंवा आपण गुगल वरती महाडीबीटी असे सर्च केले तरी आपल्याला वेबसाईट सापडेल. करण्यासाठी लिंक खाली आहे.👇mahadbtmahait.gov.in

https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा इतर शंका निरसन करण्यासाठी आपण आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा आपल्या भागातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता.

 

शेतकरी बंधू भगिनींनो अशाच नवनवीन माहिती, सरकारी योजना, नोकरी अपडेट व रोखठोक राजकीय बातम्यांसाठी वाचत रहा #महा_जागरण Maha Jagran NewsPortalआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हायला विसरू नका लिंक 👇

https://chat.whatsapp.com/EtVPNaxyHO7Lr7mw1Ijrkv

महा जागरण maha Jagran

Leave a Reply