जर शिंदे साहेबांचं बंड यशस्वी झालं नसतं तर ते त्याच वेळी डोक्यात गोळी घालून घेणार होते असं अत्यंत खळबळ उडवून देणार शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे एका पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे 20 जून हा दिवस गद्दार दिन म्हणून जाहीर करावा असं म्हणत शिवसेना नेते हे शिंदे गटाला सातत्याने दिवचत आहेत याच मुद्द्यावर बोलताना केसरकर यांनी अतिशय उद्विग्न अशी प्रतिक्रिया यावेळी दिली
माझा उठाव यशस्वी होणार की नाही त्यावेळी मी एकच गोष्ट केली असती माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे पण या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती असं एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे
दरम्यान केसरकर यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दीपक केसरकरांना एकनाथ शिंदे आत्महत्या करणार असल्याची माहिती होती परंतु त्यांनी ती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने केसरकरांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे