फेसबुक कंपनीच्या नव्या नावाची घोषणा केली

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : सोशल मीडिया (Social Media) हे सध्याच्या काळातलं व्यक्त होण्याचं, माहिती देण्याचं, तसंच मित्र, नातेवाईक, कुटुंबीयांशी कनेक्टेड राहण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे. Facebook, WhatsApp, Twitter, Instagram आणि Telegram अशी अनेक अ‍ॅप्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. फेसबुक (Facebook) सर्वांत महत्त्वाचा आणि प्रभावी प्लॅटफॉर्म समजला जातो. जगभरात आज फेसबुक युजर्सची संख्या अब्जांच्या घरात पोहोचली आहे. काही गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून फेसबुक विशेष चर्चेत आहे. आता कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी आहे. त्यानुसार आता फेसबुक कंपनी ही `मेटा प्लॅटफॉर्म्स इंक` (Meta Platforms Inc.) या नव्या नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीचं नाव, लोगो बदलण्यामागे मार्क झुकेरबर्ग यांचा नेमका काय विचार आहे?

रिब्रँडिंगबाबत बोलताना मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं, `आमची कंपनी ज्या काही गोष्टी करते, त्या गोष्टी फेसबुक या नावातून स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे आता कंपनीचं नवं नाव `मेटा प्लॅटफॉर्म्स इंक` असं असेल.’

मार्क झुकरबर्ग यांनी `मेटा`ला एका Virtual Environment चं स्वरूप दिलं आहे. फेसबुकच्या मेटाव्हर्स (Metaverse) या नव्या दुनियेत लोक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेटचा वापर करून एकमेकांना भेटू शकणार आहेत. तसंच काम करू शकणार आहेत आणि विविध खेळांचा आनंददेखील घेऊ शकणार आहेत.

Metaverse हे एक वेगळं व्हर्च्युअल जग (Virtual World) म्हणजेच आभासी जग असणार आहे. तसंच ती एक कम्प्युटर जनरेटेड स्पेस असेल. या माध्यमातून लोक एकमेकांशी संवाद साधू शकणार आहेत. यात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हार्डवेअर ब्रांच, हॉरिझॉन वर्ल्ड यांसारख्या नव्या उभरत्या उद्योगांचा समावेश असेल. तसंच व्हर्च्युअल रिअलिटी सॉफ्टवेअरचाही समावेश असेल. ही सॉफ्टवेअर्स सध्या बीटा टेस्टिंग मोडमध्ये आहेत.

मेटाव्हर्स ही एक नवी ऑनलाइन स्पेस (Online Space) असेल. या ठिकाणी लोक वास्तव जगाप्रमाणे (Real World) एकमेकांशी संवाद साधू शकतील. या माध्यमातून युजर्सना व्हर्च्युअल जगाचा आनंद घेता येईल. या ठिकाणी मित्र, नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासोबतच फेरफटकाही मारता येणार आहे. यात शॉपिंग अर्थात खरेदीचा पर्यायही उपलब्ध असेल. `मेटाव्हर्स`मध्ये स्वतःचं घर, गाडी अगदी वास्तव जगाप्रमाणे वापरणं शक्य होणार आहे. यात युजर्ससाठी एक विशेष कॅरेक्टर असेल, की जे चालू शकेल, तसंच वास्तव जगाप्रमाणे दुसऱ्या प्लेअर्ससोबत संवाद साधू शकणार आहे. विशेष म्हणजे युजर्सना या माध्यमातून व्हर्च्युअली जमीन किंवा अन्य डिजिटल अ‍ॅसेट्स क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहेत.

जेव्हा एखादी कंपनी स्वतःचं नाव बदलते तेव्हा ती कंपनीचा लोगोही बदलते. फेसबुकनेदेखील असंच केलं आहे. फेसबुकनेदेखील नवा लोगो इन्फिनिटी डिझाइनसारखा केला आहे.

Leave a Reply