फडणवीसांनी का केली भाजप जिल्हाध्यक्षांची कानउघडणी वाचा

देवेंद्र फडणवीसांनी का केली निष्क्रिय भाजप जिल्हाध्यक्ष व आमदारांची कानउघडणी वाचा

नागपूर वृत्तसंस्था

भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडिया ऑडिट केले असून या पुढेही करणार आहेत. नऊ जिल्हाध्यक्षांचा अतिशय चांगला रिपोर्ट आहे 5 जण सरासरी उपयोग करतात, तर 31 जिल्हाध्यक्ष खूपच निष्क्रिय आहेत आणि 15 भाजप जिल्हाध्यक्षांचे तर सोशल मीडियात अस्तित्वच नाही. आपली खरी लढाई विरोधकांशी नसून ते करत असलेल्या नँरेटीव्हशी आहे या पुढे सोशल मीडियाचा वापर केवळ वाढदिवस,बारसे, सांत्वन,लग्नकार्य भेटी साठी न करता विरोधकांनी रचलेल्या नँरेटीव्हचा वैचारिक प्रतिवाद करण्यासाठी वापरावेे अशी कानउघडणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधकांमधे आपल्याशी लढण्याचा राजकीय दम नाही त्यामुळे आपली लढाई विरोधकांशी नसून ते रचत असलेल्या कपोकल्पित कथानकां विरुद्ध आहे.त्या साठी भाजप नेत्यांनी सक्रिय रहावे. विरोधकांच्या षड्यंत्राला हाणून पाडण्यासाठी सामूहिकतेने लढावे लागेल अनेक नेत्यांच्या फेसबुकवर महिना महिना पोस्ट नसते काहींचे ट्विटर हँडल सुरूच नाही मात्र याउलट सामान्य भाजप कार्यकर्ते नेत्यांपेक्षा कमालीचे सक्रिय असून ते निकराची लढाई लढत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply