‘या’ योजनेचा लाभ घेऊन अकरा विद्यार्थी झाले अधिकारी

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य दिलेल्या 44 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. त्यातील 4 विद्यार्थी इतर मागास वर्ग, 3 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती-ड मधील 3 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे तसेच विशेष मागास प्रवर्गातील 1 उमेदवारालादेखील अंतिम परीक्षेत यश मिळाले आहे.

 

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.

जाहिरात

महाज्योतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रसिद्धी देण्यात आलेली होती, त्याकरिता एकूण 47 उमेदवारांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी योजनेसाठी पात्र 44 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आलेले होते.

 

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक दुधाळ, ओंकार गुंडगे, पल्लवी सांगळे, शुभाली परिहार, शुभांगी केतन, श्रुती कोकटे, रोशन कच्छाव, अनुराग घुगे, सागर देठे, अनिकेत पाटील, आदित्य पाटील समावेश आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योती अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

वाचक बंधू-भगिनींनो… वरील माहिती आपणास आवडली असल्यास आपले मित्र, नातेवाईक व आपल्या गावातील ग्रुप वर शेअर करण्यास विसरू नका! सरकारी योजना, जॉब अलर्ट व बातमी मागील बातमी जाणून घेण्यासाठी वाचत रहा महा जागरण… डेली अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा!

Tag: #Maha Jagran #mahajagran #महा_जागरण बातमी नव्हे तथ्य!

Leave a Reply