स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यास सरकारची मान्यता

बीड (प्रतिनिधी): कै.गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत कंपनी नियुक्ती करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीस यश आले असून, महाराष्ट्र शासनाने दिनांक २८ नोव्हेंबर रोजी या योजनेअंतर्गत दिनांक ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्राप्त झालेले दावे निकाली काढण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सर्वसामान्य शेतकऱ्यांना अपघात विमा मिळवून देण्यासाठी प्रीतम मुंडे यांनी प्रयत्न केल्याबद्दल माजलगाव भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत. मागील काही महिन्यांमध्ये या योजनेतील प्रस्ताव प्रलंबित राहत असल्याची बाब निदर्शनास येताच मुख्यमंत्र्यांना याबाबत खासदार मुंडे यांनी पत्राद्वारे विनंती केली होती ही योजना शेतकरी शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांचे अकस्मात निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक बळ देणारी असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयी गांभीर्य ओळखून प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यास निर्णय घेतला आहे या स्वागत स्वागताहार्य निर्णयासाठी राज्य सरकारचे व बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल अरुण राऊत यांनी अभिनंदन करून आभार मानले.

Leave a Reply