माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर अखेर देव कोपला!

गून्हा दाखल होताच राजकिय तर्क वितर्काना उधान

राम खाडे यांनी दाखल केली होती जनहित याचिका

बीड ( प्रतिनीधी ) बीड लातूर धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ व इतरांवर विविध 8 देवस्थानची जमीन लाटल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचे राजकिय तर्क वितर्क लावले जात आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 8 देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आहे.आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सामील आहे. अखेर आज सुरेश धस यांच्यासह संबधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) ipc 465,468,471,120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

असे आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply