कोंबडी आधी की अंडे…? शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर!

कोंबडी आधी की अंडे…? शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर!

पृथ्वीतलावरील मानव, पशु,पक्षी, प्राणी यांची निर्मिती कशी झाली असेल, हा माणसासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. यातील अनेक प्रश्नावर विज्ञानाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवाची निर्मिती माकडापासून झाली. डार्विनचा उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतातून हे आपण जाणतोच. पण तरीही काही प्रश्न मनात कायम रुंजी घालत असतात. त्यातीलच एक सर्वात जास्त चर्चिला जाणारा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंडे? पण आता या आश्चर्यकारक प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. कोंबडी आधी की अंडी? पृथ्वीवर प्रथम काय आले, हे शास्त्रज्ञांनी संशोधनातून शोधून काढले आहे.

 

युनायटेड किंगडमच्या शेफिल्ड आणि वॉर्विक विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी या प्रश्नावर बरेच संशोधन केले आहे. प्रदीर्घ काळ संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.प्रदीर्घ संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना समजले की या पृथ्वीवर प्रथम कोंबडी आली आणि नंतर कोंबडीने अंडी घातली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोंबड्यांशिवाय या पृथ्वीवर अंडी निर्माण होऊ शकत नाहीत. शास्त्रज्ञांच्या दीर्घ संशोधनानंतर असे आढळून आले की अंड्याच्या शेलमध्ये ओव्होक्लाडिन प्रोटीन असते, त्याशिवाय अंड्याचे कवच तयार होणे अशक्य आहे. महत्त्वाचे म्हणजे ओव्होक्लाडीन प्रोटीन फक्त कोंबड्याच्या गर्भाशयातच बनते. म्हणूनच जोपर्यंत कोंबडीच्या गर्भाशयातील हे प्रोटीन अंडी बनवण्यासाठी वापरले जात नाही तोपर्यंत अंडी बनणे अशक्य आहे.

अशाच नवनवीन मनोरंजनात्मक माहितीसाठी तसेच रोखठोक बातम्या, नोकरी अपडेट, सरकारी योजना यासाठी वाचत रहा महाजागरण न्यूज पोर्टल.

Leave a Reply