पीडित अल्पवयीन मुलगी पुण्यातून ताब्यात. मुलगा फरार

संपूर्ण बीड जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले असून लऊळ तांडा ता. माजलगाव जी बीड येथील पीडित मुलीला पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

दहा दिवसांपूर्वी लऊळ तांडा ता. माजलगाव जी बीड येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून शेख अरबाज शकूर याने पळवले होते. घटनेला लव्ह जिहादचा अँगल असल्याने हिंदू संघटना या मुद्यावर आक्रमक झाल्या होत्या.संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी अनेक पथके मुलीच्या शोधात पाठवली होती.परंतु पोलिसांना यश मिळत नसल्याने परिस्थिती चिघळत होती दरम्यान पोलीस पाठलागावर आहेत असे समजताच मुलाने पीडित मुलीला पुण्यात सोडून तो फरार झाला आहे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

Leave a Reply