“देवस्थान इनाम जमिनीचा प्रवर्ग बदलणार”

परशुराम सेवा संघाला महसूलमंत्र्यांचे आश्वासन:विनायक रत्नपारखी

मुंबई : ब्राह्मण समाजाकडे असलेल्या इनाम जमिनी वर्ग 2 संवर्गातून वर्ग 1 संवर्गात बदल करण्यासाठी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विनायक रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

संदर्भात एक बैठक दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी महसूलमंत्र्यांच्या दालनात पार पडली.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला असून या या बैंठकीस जेष्ठ कायदेतज्ञ ऍड नरेश गुगळे, भाजप अहमनगर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपसचिव श्री कोठेकर, श्री मनोज पांगारकर यांच्यासह इनाम जमीन धारक सर्वश्री सुनील कुलकर्णी, दीपक देवळे, भगवान ठोंबरे, सुधीर रामदासी,अरुण गोसावी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच त्यासंदर्भातील कायदा सभागृहात पारित केला जाइल असे आश्वासन दिले. त्यासोबतच इनाम जमिनींच्या वारस नोंदीसाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आजची बैठक सकारात्मक झाल्याचे मत परशुराम सेवा संघाने व्यक्त केले असून या कायद्याच्या माध्यमातून गेली 75 वर्षे होत असेल अन्याय दूर होईल अशी भावना परशुराम सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक रत्नपारखी ,व सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केली व परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे साहेब यांनी वारंवार केलेल्या प्रयत्नाला यश आले या बद्दल त्यांचे रत्नपारखी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply