राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून चांगलेच राजकारण तापले असून आज पहाटे जयंत पाटलांनी पुण्यात अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत एक तास चर्चा केली त्यानंतर त्यांनी शरद पवारांनी भेट घेऊन त्यांनाही भाजप प्रवेशा बाबत कळवले असल्याचे खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये न जाता भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत जयंत पाटील इच्छुक आहेत.जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.दरम्यान 15 ऑगस्ट पूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार असून जयंत पाटील यांना भाजप कडून मोठे खाते मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.