पुणे : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग भडकली. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक, वैमानिक यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे समर्थकांवर शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांचे विमान सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास बारामतीत लँड होणार होते. त्यावेळी विमान कोसळले आणि त्याने पेट घेतला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. ज्या बारामतीत अजित पवार यांचं राजकारण रुजलं, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघातापूर्वी अजित पवार यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर केलेलं ट्वीट शेवटचं ठरलं आहे.
अजित पवार यांचं शेवटचं ट्वीट
सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांनी अजित पवार यांनी ट्वीट केलं होतं. महान स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी लाला लजपत राय यांना जयंतीदिनी अभिवादन करणारं ट्वीट त्यांनी केलं. “राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.