महिला पत्रकार शर्ट पँट का घालतात? सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नाने पत्रकार अवाक 

पिंपरी चिंचवड, दीं.२० (प्रतिनिधी): मराठी महिला पत्रकार शर्ट पॅन्ट का घालतात? साड्या का नेसत नाहीत? असा अनपेक्षित सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केल्याने पत्रकारांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या,” मला खुप वेळा गंमत वाटते की चॅनेल मधल्या मुली साडी का नाही घालत? शर्ट आणि ट्राउझर का घालतात? मराठी बोलताना तुम्ही… मग मराठी संस्कृती सारखे कपडे आपण का नाही घालत…आपण सगळ्या गोष्टींचं पाश्चिमात्यकरण का करतोय” असेही त्यांनी म्हटले.

‘तु आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलेन ‘ भिडे गुरुजींच्या या विधानामुळे उद्भवलेला वाद ताजा असताना आता सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे नविन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply