लव्ह जिहाद विरूद्ध परभणीत हिंदु जनसागर रस्त्यावर!

परभणी, दी. २० (प्रतिनिधी):देशभरात लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटना रोज घडत आहेत या विरोधात आज परभणी येथे हिंदू समाज रस्त्यावर उतरला.

 

आज परभणी येथे हिंदू धर्मरक्षण मोर्चाचे आयोजन समस्त हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आले.देशभरात मागील काही काळा पासून लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटनेत वाढ झाली आहे.

हे ही वाचा: संभाजीनगर येथे प्रेम प्रकरणातून तरुणाचे बळजबरी धर्मांतरण व सुंता!

https://mahajagran.com/mulache-dharmantarn/

नुकत्याच श्रद्धाच्या घटनेने देश सुन्न झाला रोज कुठेना कुठेतरी अश्या घटना घडत आहेत हिंदू धर्मातील लेकी सुरक्षित राहण्यासाठी हिंदू समाजाची एकजूट असणे गरजेचे असल्याचे हिंदू धर्मरक्षण मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव एकवटला होता.मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा तसेच धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply