‘माजलगाव मतदार संघातील अतिवृष्टी अनुदानासाठी प्रधानसचिवांची भेट घेणार’

धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिली महिती”

बीड (प्रतिनिधी): वडवणी-माजलगाव-धारूर तालुक्यातील व तिन्ही तालुक्याचा मतदार संघ असलेल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना नुकसान अनुदान अद्याप ही मिळाले नसून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्या साठी दि. 13 मार्च रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता यांची भेट घेणार असल्याची माहिती धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिली आहे. वडवणी-धारूर -माजलगाव- तालुक्यातील शेतकर्यांना अतिवृष्टी नुकसान अनुदान, व ईतर मागण्यां साठी वेळोवेळी शासन प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अतिदृष्टीच्या नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना आतापर्यंत हे मिळाले नाही या मागण्यांसाठी शिष्टमंडळा सह राज्याचे मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता यांची दि. 13 मार्च रोजी मुंबई येथे भेट घेणार असून, या भेटी दरम्यान लेखी निवेदन देऊन मतदार संघातील शेतकर्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे देण्यात काय अडचणी आहे ती दूर करुण प्रश्न लवकरात लवकर मार्गी,लावावा. यासाठी विनंती करणार आहे त्याचबरोबर वेळोवेळी,शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम, महाराष्ट्र सरकार करत आहे हे देखील व्यथा त्यांच्याकडे मांडणार आहे आज परिस्थिती पाहता शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे शेतकऱ्यांच्या, कापसाला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी, खूप मोठ्या संकटाचा सामना करत आहे याला जबाबदार, शासन प्रशासन असून या मागणीसाठी राज्याचे मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, यांची 13मार्च रोजी मुंबई येथे भेट घेणार असून यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा, दरबारी मांडणार आहे असे देखील धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे यावेळी शेतकऱ्यांसह शिष्टमंडळ घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांची भेट घेणार आहे असे देखील दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे

 

 

…..चौकट….

तर आम्हाला संघर्ष करावा लागेल…!

 

वेळोवेळी बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातील शेतकऱ्याला अतिदृष्टीच्या अनुदानापासून वगळले जात आहे त्याचबरोबर अनुदान दिले जात नाही या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते वेळोवेळी लेखी निवेदन देत महाराष्ट्र सरकारकडे करत आहे परंतु सरकारकडून अवघ्यापही अनुदान मिळाले नाही ही या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे त्यामुळे तात्काळ या मतदारसंघातील शेतकऱ्यांना अतिदृष्टीचे अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करावे असे न केल्यास आगामी काळात यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल असे देखील धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ वाकसे यांनी म्हटले आहे

Leave a Reply