माजलगावच्या क्रिकेट खेळाडूंची गोवा गोल्ड कपसाठी निवड

माजलगाव (प्रतिनिधी) : माजलगावच्या प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड यांची नॅशनल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित गोवा गोल्ड कप 2023 (अंडर-19) साठी निवड करण्यात आलेली आहे.

 

नॅशनल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दि.25 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान गोवा येथे गोवा गोल्ड कप होणार आहे. या संघात महाराष्ट्र संघाने सहभाग घेतला असुन माजलगावचे प्रथमेश गणेश शेटे व सौरभ सुनिल गायकवाड यांची टि-20 क्रिकेट महाराष्ट्र असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद संघात निवड झालेली आहे.

या दोघांनीही जिद्द व चिकाटीच्या बळावर स्थानिक स्पर्धेत नावलौकीक मिळवलेले आहे. दोघेही ऑल राऊंडर क्रिकेटर म्हणुन ओळखले जातात. हे दोघेही तरूण क्रिकेट अ‍ॅकॅडमी, माजलगाव येथे प्रशिक्षण घेत असुन त्यांना शेख फेरोज सर, गोविंद टाकणखार, विनोद कोमटवार, मिरवाज खाँ, पेंटर भगवान, घायतिडक, शेख हाय्युम भाई, यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. गोवा येथे होणार्‍या स्पर्धेत महाराष्ट्राकडुन दोघेही प्रतिनिधीत्व करणार आहेत. ही माजलगावची व माजलगावकरांचे नाव उंचावर नेण्याची बाब आहे. या यशाबद्दल दोघांचेही सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. #महा_जागरण #Maha_Jagran न्यूज पोर्टल

Leave a Reply