माजलगावमधील अभूतपूर्व गोंधळाने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ

 

माजलगाव

पवन मोगरेकर

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता अस्वस्थ झाला असुन मतदारसंघातील भाजपचे नेतृत्व नेमकं कोण करत आहे हा प्रश्न अनुत्तरित असताना आता थेट प्रकाश सोळंकेच भाजपच्या वाटेवर दिसत असल्याने सामान्य भाजप कार्यकर्त्यांमधे प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

माजलगाव मतदारसंघातील भाजप माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांच्या नंतर अनेक गटा तटात विखुरली. आर टी देशमुख असे पर्यंत भाजप एकसंघ होती परंतु त्यांच्या पश्चात मात्र भाजपला मतदारसंघातील नेतृत्व नेमकं कुणाकडे राहणार हा प्रश्न सोडवता आलेला नाही. मोहन जगताप व रमेश आडसकर यांच्या पैकी कोण हा प्रश्न अनुत्तरित असताना आता आ. प्रकाश सोळंके हेच भाजपच्या वाटेवर दिसत असल्याने भाजप कार्यकर्त्यां मधे अस्वस्थता पसरली आहे.प्रकाश सोळंके हे भाजपचे पूर्वाश्रमीचे आमदार होते परंतु 2007 साली त्यांनी अचानक भाजप सोडून राष्ट्रवादीची कास धरली त्या नंतर आर टी जिजा देशमुख यांनी कठीण काळात भाजपची धुरा सांभाळली व पुन्हा माजलगाव मतदारसंघात कमळ फुलवले होते.

2019 साली रमेश आडसकर यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने मोहन जगताप नाराज असल्याच्या चर्चा निवडणुकी दरम्यान खूप रंगल्या त्यातून पुढे थोड्या मतांनी झालेला रमेश आडसकरांचा पराभव हा त्यांचा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.2019 पासून भाजप गटा तटात विखुरली मागील आठवड्यात मोहन जगताप यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन नेहमीप्रमाणे विधानसभा लढवणार असल्याचे सूतोवाच करून दंड थोपटले आहेत.अधून मधून सध्या दिल्लीवासी असलेले देवदुतही माजलगावातील भाजप कार्यकर्त्यांना डोळा मारून जातात ही सर्व गटबाजी कमी होती का तेच आ. प्रकाश सोळंकेही जय श्रीराम करण्याचा मानसिकतेत असल्याने माजलगाव मधील भाजप कार्यकर्ता मात्र कुणीही या आणि टिकली मारून जा या अवस्थने त्रासुन परळीच्या जागृत देवस्थानाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply