खा.प्रितम मुंडे यांच्या वाढदिवसा निमीत्त आशा वर्कर्सला साड्या वाटप

बीड: जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस माजलगाव येथे पंचायत समिती सभागृहात 151 अशा वर्कर्स महिलांना साड्या वाटप करून सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यात आला.

यावेळी बोलतांना डॉ.प्रकाश आनंदगावकर म्हणाले, कोरोनाच्या संकटमय काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता तुम्ही निस्वार्थ भावनेने केलेले कार्य व प्रामाणिकपणे निभावलेले कर्तव्य हे कधीच वाया जाणार नाही. तुम्ही कोरोनाच्या संकटकाळात हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत व त्यामुळे त्यांचे मिळालेले आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

कार्यक्रचे प्रास्ताविक अरुण राऊत यांनी केले. राऊत म्हणाले, पंकजाताई यांनी दिलेले आदेश पाळत कुठल्याही प्रकारची बॅनर जाहिरात बाजी न करता सामाजिक उपक्रमाने वाढदिवस करण्याचे ठरवले. त्यामुळे आज ज्यांनी दीड वर्षापूर्वी कोरोनाच्या संकट काळात आशा वर्कर्स महिलांनी आपल्या जीवाची परवा न करता अतिशय कमी मानधनांमध्ये काम केले होते व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले याची आम्हास जाणीव आहे. त्यामुळे आशा वर्कर्स महिलांना योग्य मानधन मिळवून देण्यासाठी व येणाऱ्या काळात आरोग्य सेवेमध्ये कायम करण्यासाठी आम्ही पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांच्यापर्यंत हा संदेश देऊन तुम्हास न्याय देण्याचा प्रयत्न करू असे अरुण राऊत या प्रसंगी बोलताना सांगितले.

सूत्रसंचलन अनंत जगताप यांनी केलेत आभार प्रदर्शन रूपाली कचरे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ.अशोक तिडके, अभय होके पाटील, डॉ प्रशांत पाटील, अँड सुरेश दळवें, सौ छाया कुलकर्णी, हनुमान कदम, ईश्वर खुरपे, विनायक रत्नपारखी, बाळासाहेब शिरसागर, बाबासाहेब आगे ,दत्ता महाजन ,सरपंच खय्युम पठाण, दिलीप सोळंके ,सूर्यकांत दराडे,अर्जुन पायघन, हरिभाऊ चंदनशिव,राम शिंदे, सर्जेराव पोटभरे,तात्या पांचाळ ,चेतन डाके, रवी कुराडे ,दत्ता क्षीरसागर ,पत्रकार दत्ता येवले , दत्ता आढाव , व भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी शक्ती प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply