सोळंके कुटुंब पुढील पन्नास वर्षे राजकारण करणार!

आ. सोळंकेचा मोहन जगताप, नितीन नाईकनवरे यांच्यावर प्रतिहल्ला 

 

माजलगाव: प्रतिनिधी

खरेदी विक्री संघाची निवडणूक व मिळालेला विजय ही सुरवात असुन आता बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालीकेत आपल्याला बाजार समिती प्रमाणे एकतर्फी विजय संपादित करायचा असून पुढचे पन्नास वर्षे सोळंके कुटुंबीय राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी नंतर आ. प्रकाश सोळंके यांनी सांगितले या प्रसंगी विरोधकांवर आरोप करताना आ. सोळंके कमालीचे आक्रमक झाले होते.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी नंतर आ. प्रकाश सोळंकेनी भूमिका स्पष्ट करताना विरोधकांवर आरोपांचा प्रतिहल्लाच केला या प्रसंगी त्यांनी मोहन जगतापांपासून नितीन नाईकनवरे यांनी केलेल्या आरोपांचा कठोर शब्दात समाचार घेतला.जे राजकारणी दारू पिऊन महापुरुषांच्या जयंतीला उपस्थित राहतात त्यांची माझ्यावर टीका करण्याची लायकी नाही तसेच मी एस. टी ने प्रवास करायचो त्याचा मला अभिमान असून एस.टी.चा प्रवास ही सोय होती माझ्याकडे 1976 साली चार चाकी गाडी होती असे सांगून त्यांनी नितीन नाईकनवरे यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र सोडले.

घराणेशाहीच्या आरोपावर त्यांनी बोलताना पुढचे पन्नास वर्षे सोळंके कुटुंबीय लोकसेवेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply