आता घ्या…पोलिसांवर वसुलीचा आरोप करणारे खा.अमोल कोल्हे निघाले थकबाकीदार!

गाडीवर तब्बल 15 चलन, ‘एवढा’ दंड येणं बाकी…

Amol Kolhe v/s Traffic Police Recovery : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेयर करत राज्य सरकार तसेच वाहतूक पोलीस विभागावर गंभीर आरोप केले होते. आता खुद्द वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामूळे “ज्ञान शिकवी लोकांना अन् शेंबूड आपल्या नाकाला ” या मराठी म्हणी प्रमाणे अमोल कोल्हे यांची गत झाली आहे.

मुंबई: खासदार अमोल कोल्हे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेयर केली होती. सरकारकडून पोलिसांच्या वाहतूक विभागाला वसुली गोळा करण्याचे टार्गेट दिले जात असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता. तसेच किती वसुली केली जाते याची आकडेवारीच कोल्हे यांनी जाहीर केली होती. यावर वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ (Joint CP Pravin Padwal) यांनी थेट अमोल कोल्हे यांच्या गाडीवर किती चलन आणि किती दंड बाकी आहे याची आकडेवारीच पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

“अमोल कोल्हे यांच्याकडं असलेल्या वाहनावर 15 चलन बाकी असून, त्यांची 16 हजार नऊशे रुपयांची रक्कम येणे बाकी आहे” – प्रवीण पडवळ, सहपोलीस आयुक्त, वाहतूक शाखा मुंबई

कोल्हे यांची माहिती चुकीची – सहपोलीस आयुक्त या संदर्भात वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे यांनी चुकीची माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नेहमीच दंड आकारला जातो. त्याबाबत कोणालाही टार्गेट दिलं गेलेलं नाही. मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन केलेल्या 1.31 कोटींपेक्षा अधिक ई-चलानमधील वाहनांकडून जानेवारी 2019 पासून 685 कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित आहे. ही दंडणीय रक्कम शासन जमा करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार आणि रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहीम हाती घेण्यात येते.

कोल्हे यांनी सादर केलेली आकडेवारी : यासंदर्भात मुंबईत ६५२ ट्राफिक जंक्शन्स आहेत, ज्याची 25 हजार रुपये प्रत्येक दिवशी जर पाहिलं तर एक कोटी 63 लाख रुपयांचा दंड दररोज वसूल होतो. जर एकट्या मुंबईत एवढा दंड वसूल होत असेल तर अन्य शहरांचं काय? असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात संबंधित मंत्रीमहोदय अथवा अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, वाहतूक शाखेचा उपयोग नियमनापेक्षा वसुलीसाठी होतो का? याची जनतेला माहिती मिळावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply