नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !

नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !

 

उन्हाळा सुरू झालाय. कोरोंनाचा प्रभावदेखील पूर्णपणे संपलाय. दहावी – बारावीच्या पाठोपाठ शाळेच्या परीक्षा देखील संपत आहेत. दोन वर्ष घरात राहून शिक्षण अगदीच घेता आले नाही असे नाही. मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटच्या सहाय्याने शक्य तेवढे शिकता आले हे ही नसे थोडके. जगातील सर्व व्यवहार ठप्प झालेले असतानादेखील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण सुरू राहिले. यामुळे मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटचे दैनंदिन आयुष्यातील महत्व सर्वांना लक्षात आले.

 

मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट आता सर्वांच्या घरात, कार्यालयात आणि व्यवसायातदेखील आलेले आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, जेष्ठ नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार अशी समाजातील सर्व स्तरातील लोक त्याचा जमेल तेवढा उपयोग करीत आहेत. मात्र आता आवश्यकता आहे ती या सर्व गोष्टींचा परिणामकारक उपयोग करून घेण्याची आणि दैनंदिन व्यवहारात सक्षमपणे वापरण्याची.

आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटविषयी आणि त्याच्या परिणामकारक वापरविषयीचे शिक्षण घेण्यासाठी MS-CIT कोर्समध्ये आवश्यक असे बदल केलेले आहेत. स्मार्ट टायपिंग स्किल्स, विंडोज १०, एम एस ऑफिस २०१३, गुगल सूट, मोबाईलची विविध ५० अॅप्लिकेशन, कोडिंग स्किल्स, २१ व्या शतकातील नवीन डिजिटल स्टडी स्किल्स, सायबर सेक्युरिटी स्किल्स, रिमोट वर्किंग स्किल्स अशी नवीन स्किल्स विद्यार्थ्यांना आता MS-CIT कोर्समध्ये शिकायला मिळतात. मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट वापरुन पर्यावरणाचे रक्षण कसे करावे याविषयीची माहिती देखील विद्यार्थ्यांना पुस्तकाद्वारे, ऑनलाईन कंटेंटद्वारे आणि सेंटरमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांद्वारे दिली जाते. मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटच्या सततच्या वापरामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची ? याविषयी देखील कोर्समध्ये शिकविले जाते.

 

या कोर्सची नव्याने रचना करताना ५० तास थेअरी, ५० तासांचे प्रॅक्टिकल आणि ४४ तासांचा स्वाध्याय अशी विभागणी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय परिमाणाची पूर्तता करणारा हा कोर्स घरी राहून पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात, पूर्णपणे सेंटरमध्ये जाऊन किंवा थेअरीचा भाग घरातील कम्प्युटर / मोबाईलवरून आणि प्रॅक्टिकलचा भाग सेंटरमध्ये जाऊन अशा तीनपैकी कोणत्याही प्रकारे करता येतो. विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे सेंटरमध्ये जाऊन शिकणे श्रेयस्कर आहे. मात्र ज्यांना दररोज प्रवास करून कोर्स करावा लागत असेल त्यांच्यासाठी थेअरीचा भाग घरातील कम्प्युटर / मोबाईलवरून आणि प्रॅक्टिकलचा भाग सेंटरमध्ये जाऊन शिकणे अधिक योग्य होईल. दैनंदिन व्यवसायामुळे, शाळा कॉलेज आणि क्लासेसच्या व्यस्ततेमुळे ज्यांना सेंटरमध्ये जाऊन MS-CIT शिकणे होणार नाही त्यांच्यासाठी संपूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात MS-CIT कोर्स उपलब्ध आहे. पुस्तक, परीक्षा आणि ई लर्निंगचे कंटेंट मराठी, हिन्दी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आणि ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा असलेल्या MS-CIT कोर्सचे प्रमाणपत्र MKCL आणि MSBTE कडून दिले जाते.

 

नव्याने येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी MS-CIT कोर्समध्येच Machine Learning, Big Data, Augmented Reality, Robotics, Virtual reality, Internet of Things, 3D Printing, Artificial Intelligence अशा विविध करिअर्सविषयी प्राथमिक माहिती दिली जाते.

 

आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटचा प्रभावी आणि परिणामकारक उपयोग करण्यासाठी, उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी, एकविसाव्या शतकात निर्माण होत असलेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, डिजिटल युगात वावरण्याचा आत्मविश्वास मिळविण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने नवीन MS-CIT कोर्स करायलाच हवा. महाराष्ट्रातील ४,५००+ केंद्रांवर, सुसज्ज कम्प्युटर लॅब आणि प्रशिक्षकांसोबत MS-CIT कोर्स चे  प्रवेश सुरू झालेले आहेत. अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या MS-CIT केंद्राशी संपर्क साधावा असे आव्हान महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे म्हणजेच MKCL कडून करण्यात आले आहे.

 

Leave a Reply