[ad_1]
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जागी वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह (NCB Sanjay Singh ) यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. आता संजय सिंह हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबरोबरच अन्य ६ प्रकरणांची चौकशी करणार आहेत. जाणून घेवूया संजय सिंह यांच्याविषयी….
(NCB Sanjay Singh ) १९९६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये पदवी घेतलेले संजय सिंह हे १९९६च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी महत्वाच्या पदाची जबाबदारी संभाळली आहे. ओडिशा पोलिसमध्ये त्यांनी अप्पर आयुक्तपदी काम पाहिले. यानंतर ओडिशाचे पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
ओडिशा येथील उत्कृष्ट कामगिरीमुळे केंद्र सरकारने २०१५मध्ये त्यांची नियुक्ती सीबीआयच्या उपमहासंचालक पदावर केली. सध्या संजय सिंह हे ‘एनसीबी’ उपमहासंचालक कार्यरत आहेत.एका रिपोर्टमधील माहितीनुसार, संजय सिंह यांनी २०१०मधील राष्ट्रकूल घोटाळ्यासह ड्रग्ज संदर्भातील अनेक महत्वपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. ओडिशामधील ड्रग्ज विरोधी कृती दलाचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. आता ते आर्यन खान प्रकरणाबरोबरच नवाब मलिक यांच्या जावयाच्या ड्रग्ज प्रकरणाचीही चौकशी करणार आहेत.
हेही वाचलं का?
[ad_2]