नांदेड/परभणी प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे दी 24 व 25 फेब्रुवारी रोजी नांदेड, परभणी, व हिंगोलीच्या दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांच उदघाटन ते करणार आहेत.
केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर येत असून दी 24 फेब्रुवारीला सकाळी नांदेड येथे नागपूरवरून विमानाने येत आहेत.शुक्रवारी ते दिवसभर नांदेड येथे विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून रात्री 9 वाजता नांदेड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यां समवेत बैठक घेऊन नांदेड येथील शासकीय विश्राम गृहात मुक्काम करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता परभणी येथे त्यांचे आगमन व कृषी विद्यापीठात जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व विविध विकासकामांच उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12.30 वाजता हिंगोली येथील कार्यक्रम आटपून ते दुपार नंतर मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान नितीन गडकरींच्या या दौऱ्याने परभणी व नांदेड,हिंगोली जिल्ह्यातील रस्त्यांचे विविध प्रश्न मार्गी लागतील अशी जनतेची अपेक्षा आहे.